Abdul Sattar : मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय, कृषिमंत्री अब्दुल सत्तार स्पष्टच बोलले…

एमपीसी न्यूज : मॉलमध्ये आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. या निर्णयानंतर मोठा (Abdul Sattar) गदारोळ झाला होता. तेव्हा विरोधी पक्ष असलेल्या भाजपने याला जोरदार विरोध केला होता. मात्र, आता भाजपच्या पाठिंबाच सरकार राज्यात आहे. त्यानंतर पुन्हा एकदा वाईन विक्रीचा मुद्दा समोर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री असलेले शंभूराजे देसाई यांनी पुन्हा एकदा मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे आम्ही जनतेची मतं मागवली आहेत आणि त्यानुसार यावर निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील मॉलमध्ये वाईन विक्री या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. हा निर्णय राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचा राहील. त्यामुळे कृषिमंत्री म्हणून माझा या निर्णयाला पाठिंबा राहील असं स्पष्टपणे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. अब्दुल सत्तार गुरुवारी पुणे दौऱ्यावर होते. पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे टीईटी घोटाळ्यात समोर आली होती. त्यावर देखील अब्दुल सत्तार यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले शिक्षण विभागातीलच काही अधिकाऱ्याने आपल्या मुलींची नावे जाणीवपूर्वक या यादीत टाकली होती का याची सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. माझ्याविरुद्ध रचलेला हा कट आहे. येत्या पंधरा दिवसात याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला हवं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Today’s Horoscope 23 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.