Vadgaon Maval news : कंपनीत घुसलेल्या भेकराला सोडले जंगलात

एमपीसी न्यूज – वडगाव मावळमधील साते गावातील एका कंपनीमध्ये शनिवारी सकाळी घुसलेल्या एका भेकराला वन्यजीव रक्षक संस्थेचे व वडगाव मावळ परीक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी जवळच्याच जंगलात सोडून देण्यात आले.

 

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य मिथुन गबणे आणि वन्यजीव रक्षक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी सांगितले की,  सकाळी 7.30 ते 7.45 च्या दरम्यान या भेकराला जंगलात सोडण्यात आले.

 

 

एका टेम्पोमध्ये हे भेकर जाऊन बसले होते, त्यावेळी गराडे, अनिल आंद्रे आणि जिगर सोळंकी, निनाद काकडे, दक्ष काटकर, सचिन वाडेकर यांनी व वन विभागाचे वनरक्षक संदीप जांभुळकर, आशा शेळके, मोहिनी शिरसाठ आणि शिवाजी भिंडने यांनी या भेकराला पकडले. पशुवैद्यकीय रुग्णालयच्या डॉ.रुपाली दडके यांनी भेकरावर प्रथमोपचार केले व त्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.