Pune : …अन्यथा नगर रोड मेट्रो प्रकल्पाला होणार विलंब

एमपीसी न्यूज – नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गुंजन ते शास्त्रीनगर चौकांदरम्यान दुहेरी उट्ठाणपूल उभारायचा की नाही, याचा निर्णय महापालिकेच्या अखत्यारीत असून, नगर रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू झाले असल्याने त्याबाबत पालिकेने लवकर निर्णय घ्यावा; अन्यथा नगर रोड मेट्रो प्रकल्पाला विलंब होईल, असे ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले. मेट्रो प्रकल्पाच्या वनाज ते शिवाजीनगर नळस्टॉप चौकात होणा-या दुहेरी उट्ठाणपुलाच्या धर्तीवर नगर रस्त्यावरही गुंजन चौक आणि शास्त्रीनगर चौकात दुहेरी उड्डाणपूल करण्याची मागणी भाजपचे वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक  यांनी केली होती.

उट्टाणपुलासाठी सुमारे १७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा दुहेरी उडाणपूल उभारणे शक्य असले, तरी त्यासाठीचा खर्च
महापालिकेलाच करावा लागेल, असे दीक्षित यांनी सांगितले.
पुणे मेट्रोच्या सविस्तर प्रकल्प आराखड्यात या पुलाचा समावेश नव्हता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी खर्च करण्याची तरतूद मेट्रोकडे उपलब्ध नाही. त्यामुळे पालिकेलाच त्यासाठी सर्व निधी उपलब्ध करून द्यावा लागेल. दुहेरी उडाणपुलाच्या खांबांवरून मेट्रो धावणार असल्याने एकूण खर्चात पालिकेची २५ टक्के बचत होऊ शकेल, असा दावा दीक्षित यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.