Pimpri : वित्त आयोगाच्या शिष्ट मंडळाने शहरातील विकासकामांची केली पाहणी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी आलेल्या भारत सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाच्या शिष्ट मंडळाने निगडीतील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुध्दीकरण प्रकल्पास भेट दिली. तसेच शहरातील विविध विकास प्रकल्पांची पाहणी केली. 

_MPC_DIR_MPU_II

महापौर राहुल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिष्ट मंडळाचे स्वागत केले. शिष्टमंडळात 15 व्या वित्त आयोगाचे प्रभारी अध्यक्ष शक्तीकांत दास, सचिव अरविंद मेहता, सहसचिव मुखमितसिंग भाटिया, वित्त सल्लागार अँथोनी सायरिक, सहाय्यक संचालक प्रविण जैन, सदस्य डॉ. अनुप सिंग, डॉ. अशोक लहिरी, डॉ.रमेश चंद, भरतभुषण गर्ग, डॉ.रवि कोटा यांचा समावेश होता. यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, पुणे मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बि-हाडे, महामेट्रोचे मुख्य निवासी अभियंता श्रीवास्तव यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य लेखापाल राजेश लांडे, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रविण लडकत, विशाल कांबळे, संदेश चव्हाण, बापु गायकवाड, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम.शिंदे, उद्यान अधिक्षक ज्ञानेश्वर गायकवाड, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आलेल्या शिष्ट मंडाळाला शहाराची झपाट्याने होत असलेली वाढ, पाण्याची उपलब्धता व यासाठी करावयाचे नियोजन याबाबत सादरीकरण केले. शिष्ट मंडळाने निगडीतील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुध्दीकरण प्रकल्पास भेट दिली. तसेच शहरातील विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. तसेच जलशुध्दीकरण केंद्र परिसरात वृक्षरोपणही करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1