Pune : समाविष्ट गाव आणि उपनगरांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष – दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज – समाविष्ट गाव आणि उपनगर हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले आहेत. त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले आहे, आशा शब्दांत विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ यांनी भाजपवर हल्लाबोल केला. महापालिकेच्या अंदाजपत्रकावर बुधवारी आयोजित चर्चेत त्या बोलत होत्या.

दीपाली धुमाळ म्हणाल्या, स्थायी समिती अध्यक्षांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या विकासकामांना जाणूनबुजून कात्री लावली. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांत कोणताही विकास झालेला नाही. कर्वेनगर – वारजे – माळवाडी भागांसाठी निधी देण्यात आला नाही.

शहरी – गरीब योजनेला कमी निधी आहे. शहरातील कचरा दुसऱ्या भागात टाकला जातो. फुरसुंगीमधील लोक आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. स्वच्छता अभियान होते, तेव्हा शहर स्वच्छ होते. आता मात्र मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होत आहे. 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना याकडे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. मेट्रोचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. शिवसृष्टी लवकरात लवकर करण्यात यावी. राज्य शासनाकडे आम्ही पाठपुरावा करू, असेही धुमाळ यांनी निक्षून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.