Hinjawadi : हिंजवडीच्या घटनेतील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – कासारसाई येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा चिंचवड किवळे मंडल महिला आघाडी भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच आरोपींवर त्वरीत कारवाई करण्याची मागणीही आघाडीतर्फे करण्यात आली. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांना अध्यक्षा भारती  विनोदे यांनी निवेदन दिले.

गणपती विसर्जन सोबत असल्या वाईट विकृतीचे सुद्धा विसर्जन झाले पाहिजे आणि आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पदाधिकारी यांनी निवेदन देऊन वरील घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी निता परदेशी प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिता सोनवणे, पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष पद्मिनी पंडीत, आशा बोरकर, पूनम वाघमारे, आदी महिला उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.