Pune : सफाई कर्मचारी यांना वारसा हक्काप्रमाणे नियुक्ती देण्याबाबतची मागणी    

एमपीसी  न्यूज –   सफाई कर्मचारी बांधवांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी चालू करण्याबाबत तसेच, सफाई कर्मचारी यांना वारस हक्काप्रमाणे नियुक्ती देण्याबाबतची मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेश महामंत्री दीपक निनारिया यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अजय रामानंदी, शहर उपाध्यक्षा मुकेश चव्हाण, पुणे शहर महिलाध्यक्षा रेखा राजे, पुणे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष अरविंद सुसगोहेर, उपाध्यक्ष नितीन सुसगोहेर,  सचिव सुरेश वाल्मिकी, संघटक नितीन सोलंकी आदी संघटनेचे पदाधिकारी  उपस्थित होते. केंद्र शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासन दिनांक २०  फेब्रुवारी  २०१९ रोजी शासकीय कर्मचारी यांना वेतन निश्चित सुधारित वेतन संबंधित स्पष्टीकरण दिला आहे.

त्याचप्रमाणे पुणे कॅन्टोन्मेंट कर्मचारी यांना सुधारित वेतन नियम २०१९ प्रमाणे सातवे वेतनाचा लाभ देण्यात यावा. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमधील सफाई कर्मचारी यांच्या शासन निर्णयानुसार वारस हक्कांचे अनेक प्रकरणे प्रलंबित आहे . पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये सेवा निवृत्त व मृत्यू झालेल्या व्यक्तीस त्यांच्या वारसदारांना लाड पागे समितीच्या व शासन निर्णयानुसार तातडीने नियुक्ती देऊन दलित पथ दलित समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.