Pimple Saudagar : लिनीअर अर्बन गार्डनला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – संपुर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठे (2 कि. मी) लांबीच्या गार्डनचे काम पिंपळे सौदागरमध्ये सध्या सुरु आहे. पिंपळे सौदागर येथील या लिनीयर अर्बन गार्डनला ‘छत्रपती शिवाजी महाराज लिनीअर अर्बन गार्डन’ असे नाव देण्याचे मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या विकासात या गार्डनमुळे भर पडणार असून, शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये देखील पिंपळे सौदागर प्रभागाचा समावेश झाल्यामुळे येथील विकासात आणखीनच भर पडणार असल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.