Pimpri : पिंपरी कैलासनगर भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी 

एमपीसी न्यूज – पिंपरी कैलासनगर येथील प्रभाग क्रमांक २१मध्ये पिण्याच्या पाण्याचा असुरळीत पुरवठा होत आहे. पिंपरीत सकाळी टॅंकरने दररोज सुरळीत पुरवठा करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे  अजय लोंढे यांनी ग क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की,  प्रभाग क्रमांक 21 मध्ये ठिकठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील विवद भागात नागरिक त्रस्त झाले आहेत. पिंपरी परिसरापासून पिण्याच्या पाण्याच्या टाक्या 10 किलोमीटर दूरवर असल्याने नागरिकांपर्यंत पिण्याच्या पाण्याचे पुरवठा नियोजन करण्यात अडचणी येत आहेत. तरी दररोज सकाळी 7 ते 9 या वेळेत पिण्याच्या पाण्याची टॅंकर सुविधा योग्य प्रमाणात करण्यात यावी. तसेच पाणी प्रश्न निवारणासाठी योग्य उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात, असेही निवेदनांत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.