Pimpri : यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर नियंत्रण ठेवण्याची जागृत नागरिक महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील भोंगळ कारभारावर नियंत्रण ठेवण्यात यावे. तसेच रुग्णालयातील काही कर्मचारी आणि अधिकारी यांच्या गैरवर्तनाने यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचा दर्जा खालावत असल्याची तक्रार जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन यादव यांनी  यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांच्याकडे नागरिकांनी केली आहे.

दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालायामध्ये उपचारासाठी पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, खेड, मंचर आदी विविध भागांतून रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. रुग्णालयातील रुग्णसेवेवरील विश्वासाने अल्पदरामध्ये उपचार होत असल्याने दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. अल्पदरातील उत्तम रुग्णसेवा यासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचा सार्थ अभिमान आहे.

मात्र, यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील कर्मचारी व अधिकारी यांचा दर्जा खालावत चालले आहे. कर्मचारी व अधिकारी हे रुग्णांशी उद्धटपणे बोलतात, तक्रार वहीमध्ये तक्रार लिहिण्यास मज्जाव करने याबाबी अत्यंत गंभीर असून रुग्णालयाच्या नावलौकिकास बाधा पोहचविणा-या आहेत. कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी व रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्याने वागण्यासाठी आदेश द्यावेत असेही म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.