Pune : वारीतील भक्तीरंग साकारले रांगोळीतील रंगांमधून 

शिवस्वराज प्रतिष्ठान व कुसुमनंदन नाट्य संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध रंगावलीकार राष्ट्रीय पुरस्कार विजेते सोमनाथ भोंगळे यांच्या थ्रिडी रांगोळ्यांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज – आषाढीवारी निमित्ताने विविध ठिकाणांहून आलेल्या वारक-यांकरिता शिवस्वराज प्रतिष्ठान व कुसुमनंदन नाट्य संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध रंगावलीकार राष्ट्रीय पुरस्कार विजेते सोमनाथ भोंगळे यांच्या थ्रिडी रांगोळ्यांचे प्रदर्शन वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात भरवण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन वानवडी येथील वरीष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजक अमित शेलार, संयोजक प्रमोद रणवरे, रत्नप्रभा जगताप, निलेश मगर, सुदाम जांभुळकर, सासवड नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका सीमाताई भोंगळे इ. उपस्थित होते.
या प्रदर्शनात वारीतील क्षणचित्रे रेखाटण्यात आली आहेत. विठ्ठल रुक्मिणी, माउलींचा धावता घोडा, फुगड्या, मृदुंग वादन व वारकर्यांचे विविध रूपे रंगवली आहेत. अमिताभ बच्चन यांचे विठ्ठलाला वंदन करतानाचे रांगोळी चित्र प्रमुख आकर्षण आहे.

सहकलाकार मयुर दुधाळ, प्रिया दुधाळ, ओंकार गिरमे, महेंद्र मेटकरी, सविता चांदगुडे, सुलभा गणगे, गणेश खरे, साक्षी तुरटे, भाग्यश्री साळवे, अक्षय जोशी, मंजिरी जगताप, डॉ राजेश माने, वर्षा चर्हाटे, मनिषा दिक्षित, जान्हवी सोनार, गौरव जगताप तसेच रिया आणि आविष्कार भोंगळे हे बालकलाकार यांनी या रेखाटनात सहभाग घेतला. हे प्रदर्शन शनिवार २९ जून पर्यंत सकाळी ९ ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.