Sangvi : आमदारांच्या धाकट्या भावाच्या खात्यातून साडेपाच हजार अमेरिकन डॉलर गायब

एमपीसी न्यूज – बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून त्याद्वारे अमेरिकेतील बँकेच्या खात्यातून 5 हजार 626.26 डॉलर ऑनलाईन पद्धतीने काढून घेतले. खात्यातून काढून घेतलेली रक्कम भारतीय चलनात 4 लाख 26 हजार 947.26 एवढी आहे. ही रक्कम आमदारांच्या लहान भावाच्या खात्यातून गायब झाल्याने आता या फसवणुकीची सर्वच स्तरांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. ही घटना 20 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या पूर्वी घडली.

शंकर पांडुरंग जगताप (वय 44, जगताप पाटील कॉम्प्लेक्स, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर जगताप हे भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे अमेरिकेमधील अमेरिकन एक्सप्रेसमध्ये त्यांचे क्रेडिट कार्ड आहे. त्यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती अज्ञात आरोपीने हॅक करून त्याद्वारे त्यांच्या खात्यावरून 5 हजार 626.26 अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनातील 4 लाख 26 हजार 947.26 एवढी रक्कम काढून घेतली. ही बाब जगताप यांच्या 20 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास लक्षात आली. त्यानुसार त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.