Pune : हर्बल कंपनीच्या डिलरशीपच्या आमिषाने इसमाची 30 हजार रुपयांना फसवणूक

अज्ञात मोबाइल धारक महिलेवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एका हर्बल कंपनीची डिलरशीप देण्याचे आमिष देऊन एका इसमाची 30 हजार रुपयांना फसवणूक केली. ही घटना 25 एप्रिल ते 11 मे या दरम्यान घडली. एका 35 वर्षीय पुरुषाने या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी यांना एका अज्ञात मोबाइलधारक महिलेने वेदश्री हर्बल कंपनीची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर डिलरशीपसाठी 20 हजार रुपये व वेबमेल सॉफ्टवेअरसाठी 10 हजार रुपये, असे एकूण 30 हजार रुपये बँकेत भरायला लावले. मात्र, नंतर फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारची डिलरशीप न देता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली.

फिर्यादींच्या तक्रारीनुसार याप्रकरणी अज्ञात मोबाइलधारक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वारजे पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.