BNR-HDR-TOP-Mobile

Akurdi : दिवाळीसांज कार्यक्रमाने आकुर्डीत रंगत

75
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – रौप्यमहोत्सवी नवयुग साहित्य ,शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ आणि साहित्य संवर्धन समिती यांच्या वतीने बीना इंग्लिश मिडियम स्कूल आकुर्डी येथे दिवाळी सांज हा संगीतमय कार्यक्रम झाला. रसिकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

“दिवाळीसांज” या संगीतमय कार्यक्रमाच्या प्रसंगी पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी प्रा. तुकाराम पाटील, पी.बी.शिंदे, राजेंद्र घावटे, नंदकुमार मुर्डे,रजनी अहेरराव, सविता इंगळे, वर्षा बालगोपाल,माधुरी विधाटे,अंतरा देशपांडे, सुनिता पोहनेकर आदी साहित्यिक उपस्थित होते.

भाऊसाहेब भोईर म्हणाले की, साहित्यिकांचा सहवास लाभणे ही भाग्याची गोष्ट आहे. आज तर कवी, गीतकार,गायक,वादक, संगीतकार आणि खरे रसीकजन एकत्र आले आहे. हीच ख-या अर्थाने दिवाळी आहे. समाजाला सुदृढ बनवण्याचे काम कलाकारच करत असतात. समाजातून आज संवाद हरवत चालला आहे. साहित्यिक उपक्रमांमुळे लोक निदान एकत्रतरी येतात व आनंदाची देवाण-घेवाण होते. साहित्यिकांमुळेच शहराची उंची वाढते. शहरात किती श्रीमंत आहे हे कुणी बघत नाही, तर शहरात किती साहित्यिक आहे हे बघतात. साहित्यिकांबरोबर नेहमी संयमी असावे.तरच साहित्याला सन्मान मिळतो.
बीना स्कूलचे संस्थापक अध्यक्ष इकबाल खान म्हणाले ‘ज्योतसे ज्योत जगाते चलो प्रेमकी गंगा बहाते चलो’. हे सगळे साहित्यिकांमुळेच शक्य आहे. आज समाजात जे जाती धर्माच्या नावाने विष पेरले जात आहे त्याला सगळ्यांनी एकजुटीने थांबवायला हवे.

नवयुग साहित्य,शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राज अहेरराव म्हणाले, ” भाऊसाहेबांनी या शहराला सांस्कृतिक उंची प्राप्त करुन दिली आहे.अजूनही मनपा तर्फे शहरात एक सुध्दा छोटेखानी सांस्कृतिक भवन नाही,जेथे हक्काने साहित्य संगीताची तालीम घेऊ शकू. अनेक वेळा मनपा कडे पाठपुरावा केला. मात्र कुणीच दखल घेत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. भाऊसाहेब जर आमदार किंवा खासदार असते तर आम्हा कलाकारांना कुणाच्या अंगणात साहित्यिक उपक्रम राबवायची पाळी आली नसती.

यावेळी ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . या संगीतसंध्येला पणत्यांच्या प्रकाशात सुगम संगीताची मैफिल व शिवाजीराव शिर्के यांच्या “पवनेचा प्रवाह” या दिवाळी अंकाचा प्रकाशन समारंभ पार पडला.

गायक कलाकार म्हणून सारिका ठाकरे, उमेश पुरंदरे, निलिमा दहीवाल, सुगंधा सुपेकर यांनी रसिकांची मने जिंकली.तसेच (संवादिनी) माऊली ईटकर, (तबला) रुपक शिधये व निवेदन माधुरी ओक यांनी करुन उत्तम साथसंगत केली.

कार्यक्रमाचे संयोजन सुरेश कंक,अक्षय लोणकर ,स्वप्नील अहेरराव यांनी केले.सूत्र संचलन अश्विनी कुलकर्णी यांनी केले. आभार उज्ज्वला केळकर यांनी केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.