Chikhali : ‘कट’ मारल्याचा जाब विचारल्याने टोळक्याची डॉक्टरला मारहाण 

एमपीसी न्यूज –  ‘मोटारीला कट का मारला’ असे विचारले म्हणून चौघांनी डॉक्टरला शिवीगाळ करत दगडाने, हाताने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.19) रात्री पावणेदहा वाजता चिखलीतील स्पाईन रोड येथे घडली.

या प्रकरणी डॉ. मनिष कमलकांथ पाठक (वय 29, रा. साईल फॉच्यून फ विंग, जाधववाडी, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज चंद्रकांत काशीद, आशिष माधव सुपेकर, वैभव ज्ञानोबा वारकरी, अनिकेत कदम (सर्व रा. घरकुल, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री फिर्यादी पाठक स्पाईन रोडने जाधववाडीकडे मोटारीने जात होते. आरोपी सुरज याने फिर्यादी यांच्या मोटारीला कट मारला. यावेळी त्यांनी आरोपीला ‘दादा कट का मारला’ असे विचारले. त्यावरून चिडलेल्या आरोपीने फिर्यादीच्या मोटारीचा पाठलाग करून आपल्या साथीदारांना बोलावून घेत कुदळवाडी पुलाखाली त्यांची मोटार अडविली.

डॉ. पाठक यांना खाली उतरवत शिवीगाळ करत दगडाने, हाताने मारहाण केली. तसेच डॉ. पाठक यांना मदतीसाठी आलेल्या इशांत अल्लाउदीन खान यांच्या मोटारीची काच फोडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. निगडी ठाण्याचे फौजदार आर. एम. भोये अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.