Pune : कार अंगावर आल्याचा जाब विचारल्याने तरुणाच्या डोळ्यांवर वार

एमपीसी न्यूज – कार अंगावर आल्याचा जाब विचारल्याने तिघांनी तीक्ष्ण हत्याराने तरुणाच्या अंगावर, पाठीवर आणि डोळ्यावर वार केले. वार करून आरोपी पसार झाल्यानंतर पोलिसांनी 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.   

सतिश वानखेडे, असे फिर्यादी तरुणाचे नाव आहे. योगेश हाणमने, रितेश जाधव आणि अविनाश गायकवाड, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश वानखेडे हे शनिवारी पुणे विमानतळावरून बहिणीला सोडवून आपल्या दुचाकीवरून अक्षय जाधव यांच्यासोबत हडपसरकडे येत होते. यावेळी आरोपी कारमधून येत होते. कार वानखेडे यांच्या अंगावर आली. याचा जाब त्यांनी आरोपींना विचारला.

जाब विचारल्याने चिडलेल्या चौघांनी वानखेडे आणि जाधव यांचा पाठलाग करून त्यांना पकडून त्यांच्यावर धारदार शस्त्राने अंगावर, पाठीवर व डोळ्यांवर वार केले.

दरम्यान, 24 तासात आरोपींना पुणे पोलिसांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.