Dehuroad : कुत्र्याने विष्ठा केल्यावरून एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – कुत्र्याने विष्ठा केल्यावरून कुत्र्याच्या मालकाला चार जणांनी मिळून मारहाण केली. तसेच डोक्यात कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी साडेसातच्या सुमारास आंबेडकर नगर देहूरोड येथे घडली.

प्रमेश लक्ष्मण मदली (वय 28, रा. आंबेडकर नगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अहमद समशेर खान, अमीर पटेल, असिफ शेख, पिंकी (पूर्ण नाव माहिती नाही, सर रा. देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमेश यांच्या कुत्र्याने आरोपींच्या दारात विष्ठा केली. यावरून आरोपींनी संगनमत करून त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच अहमद याने त्यांच्या डोक्यात कोयत्याने मारले. यामध्ये लक्ष्मण मदली गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.