Bhosari : उघड्या दरवाजावाटे 29 हजारांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी 29 हजार 510 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चक्रपाणी वसाहत भोसरी येथे गुरुवारी (दि. 5) पहाटे घडली.

बाळासाहेब सर्जेराव कदम (वय 35, रा. श्रीराम मंदिराजवळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 5) पहाटे दोन ते चार वाजताच्या दरम्यान फिर्यादी कदम यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी चोरट्याने आत प्रवेश करून दोन मोबाइल आणि सोन्याचे दागिने असा 29 हजार 510 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.