BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : चालकाला हत्याराचा धाक दाखवून कारमधील साहित्य चोरले

एमपीसी न्यूज – चालकाला हत्याराचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी कारमधून बॅटरी व कार टेप चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 10) पहाटे पिंपळेगुरव येथे घडली.

सायबु दत्तू चव्हाण (वय 55, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सायबु मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पिंपळेगुरव येथील कृष्ण विहार सोसायटीसमोर सार्वजनिक रोडवर त्यांच्या कारमध्ये झोपले होते. त्यावेळी तीन चोरटे त्यांच्या कारजवळ आले. चोरट्यांनी सायबु यांना हत्याराचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच यांच्या सुमो गाडीतील एक्साईड बॅटरी व कार टेप असा एकूण 3 हजार 500 रुपये किमतीचा माल चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3