Pune News : चालकाला मारहाण करून हुंडाई सेंट्रो कार पळवली

एमपीसी न्यूज : पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कामावर जाण्यासाठी कारमध्ये बसत असताना एका व्यक्तीला मारहाण करत त्याची हुंडाई सेंट्रो कार अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती परिसरात हा प्रकार घडला. 

याप्रकरणी सुदाम पंडित गोडगे (वय 39) त्यांनी फिर्याद दिली असून दोघांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 26 एप्रिल रोजी फिर्यादी हे रात्रीच्या वेळी कामावर जाण्यासाठी त्यांच्या  कार जवळ गेले. कारचा दरवाजा उघडत असताना दोन आरोपी त्याठिकाणी आले आणी त्यांनी फिर्यादीला धक्का मारून खाली पाडले. ‘यहा से हिलना मत, नही तो जान से मार दुंगा’ असे म्हणत त्यांच्या ताब्यातील हुंडाई सँट्रो कार जबरदस्तीने चोरून नेली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.