Dehuroad : दारूड्या पतीने पत्नीला पेटवले

एमपीसी न्यूज – दारू पिण्यावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या अंगावर काडी टाकून पेटवून दिले. यात पत्नी 60 टक्के भाजली असून पतीवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 19 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती बालाजी मोरे (वय-25, रा. इंदीरानगर, देहूरोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोरे याला दारूचे व्यसन आहे. आरोपीच्या दारूच्या व्यसनावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. 13 मार्च रोजी आरोपीने फिर्यादी यांच्या अंगावर काडी टाकून त्यांना पेटवून दिले. यामध्ये फिर्यादी या 60 टक्के भाजल्या आहेत. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.