Pune District News :- दारूडा नवरा म्हणाला तू मरून जा, बायकोने घेतले पेटवून

उपचारा दरम्यान बायकोचा व मृत्यू

एमपीसी न्यूज : दारूच्या नशेत नवर्‍याने बायकोला ‘तू मरून जा’ असे म्हणाल्याने रागाच्या भरात बायकोने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या बायकोचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. 

मयुरी महावीर मोहोळ (वय 23) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. इंदापूर पोलिसांनी या प्रकरणी पती महावीर मोहोळ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या दिवशी आरोपी दारू पिऊन घरी आला होता. दारूच्या नशेत त्याने मारहाण आणि शिवीगाळ केली. तसेच तुझ्यात हिम्मत असेल तर स्टोव्ह मधील डिझेल काढून अंगावर ओतून पेटवून घे असेही म्हणाला. रागाच्या भरात मयुरी मोहोळ यांनी स्टोव्ह मधील डिझेल काढले आणि अंगावरून स्वतः पेटवून घेतले.

त्यानंतर सोलापूर मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना 3 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. मयुरी मोहोळ यांनी मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सारंगकर करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III