Pune : पुणे कॅन्टोन्मेंटमधील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी देण्यात यावी

पुणे कॅन्टोन्मेंट कर्मचारी संघ ट्रेंड युनियन, अखिल भारतीय सफाई मजदूर संघ व कामगार युवा सेनेची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामधील कर्मचारी बांधवाना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी मिळण्याकरिता पुणे कॅन्टोन्मेंट कर्मचारी संघ ट्रेंड युनियन, अखिल भारतीय सफाई मजदूर संघ व कामगार युवा सेना या तिन्ही संघटनाच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. तसेच
बोर्डाचे उपाध्यक्ष नगरसेवक विवेक यादव यांच्याकडे देखील मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट कर्मचारी संघ ट्रेंड युनियन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष किशोर संघेलिया, अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष मनोज पटेलिया व  कामगार युवा सेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष चंद्रकांत धोंगडे आदी मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी बांधव उपस्थित होते.

केंद्रशासनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासन २० फेब्रुवारीला शासकीय कर्मचारी यांना वेतन निश्चित सुधारित वेतन संबधित स्पष्टीकरण दिला आहे. त्याचप्रमाणे आपल्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामधील कर्मचारी बांधवाना सुधारित वेतन नियम २०१९ प्रमाणे सातव्या वेतनाचा लाभ अजूनपर्यंत दिला गेला नाही. २ डिसेंबरपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी देण्यात येईल, असे आश्वासन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी कर्मचारी संघटनाच्या प्रतिनिधींना दिली आहे.

यावेळी कर्मचारी बांधवानी बोर्डाचे उपाध्यक्ष नगरसेवक विवेक यादव यांच्याशी चर्चा करून आपली मागणी करण्यात आली. त्यांनी देखील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करून आपली मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक दिलीप गिरमकर व नगरसेविका डॉ. किरण मंत्री उपस्थित होते.

अन्यथा पुणे कॅन्टोन्मेंट कर्मचारी संघ ट्रेंड युनियन, अखिल भारतीय सफाई मजदूर संघ व कामगार युवा सेना या तिन्ही संघटनाच्यावतीने आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.