Football Update: 17 जूनपासून रंगणार इंग्लिश प्रीमियर लीग

The English Premier League will start on June 17

एमपीसी न्यूज – युरोपातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा इंग्लिश प्रीमियर लीगला आता दि. 17 जूनपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. सदर स्पर्धेतील 20 संघांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. चाहत्यांसह ही आनंदाची बातमी आहे.

लॉकडाउन काळात ठप्प झालेले क्रीडाविश्व पुन्हा एकदा हळूहळू सुरळीत होत आहे. जर्मन सरकारने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेला मान्यता दिली आहे. यानंतर प्रेक्षकांव्यतिरीक्त या सामन्यांना सुरुवातही झाली.

यानंतर स्पेन सरकारनेही दि. 8 जून पासून स्थानिक स्पर्धांना मान्यता दिली. यानंतर फुटबॉलप्रेमींमध्ये मानाचे स्थान असलेल्या इंग्लिश प्रमिअर लिग स्पर्धेला 17 जूनपासून पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे.

मँचेस्टर सिटी विरुद्ध आर्सेनल आणि अ‍ॅस्टन व्हिला विरुद्ध शेफील्ड युनायडेट हे संघ 17 तारखेला सामना खेळतील. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून या प्रीमियर लीगला पुन्हा सुरुवात होणार आहे.

पहिल्याच दिवशी मँचेस्टर सिटी आणि आर्सनल या बलाढ्य संघांमध्ये सामना होणार आहे. त्यानंतर 19 ते 21 जूनला 20 संघांचे ठरलेले सामने होतील.

दि. 13 मार्च रोजीचा सामना झाल्यानंतर प्रीमिअर लिग स्पर्धा कोरोना विषाणूमुळे स्थगित करण्यात आली होती. यानंतर सुमारे 3 महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा प्रीमिअर लिग स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.