BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : मोरया गोसावी महाराज वाड्यातील गणपती मंदिरात कलासेवा कार्यक्रम उत्साहात

एमपीसी न्यूज – संस्कार भारती व मोरया गोसावी महाराज संस्थान, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मोरया गोसावी महाराज वाड्यातील गणपती मंदिरात कलासेवा कार्यक्रमाचे आयोजन काल (दि. १३) करण्यात आले.

यावेळी संस्कारभारती संगीत विधेने गायन व वादनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले होते. यात गायिक स्नेहल कुलकर्णी, अमृता दाते यांनी सुंदर अभंग गायले. यांना तबला साथ विनोद सुतार, टाळ वादन निलेश शिंदे व हार्मोनियम साथ व कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन उमेश पुरोहित यांनी केले होते.

संवादिनी सहवादक, हरीदास सावंत, जुईली अवसरे, प्रथमेश चोपडे यांनी चारूकेशी राग संवादिनीवर सादर केला होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षितीजा राऊत यांनी केले. कलाकारांचा सत्कार समिती सदस्य सुहास जोशी, सुषमा वैद्य व साहित्य विधा प्रमुख विशाखा कुलकर्णी यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाबद्दलचे मनोगत उमेश पुरोहित यांनी व्यक्त केले.

संस्कार भारती अंतर्गत दर महिन्याच्या दुस-या व चौथ्या शनिवारी ही सेवा दिली जाणार आहे. यात नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य, चित्रकला, रांगोळी अशा विविध कलांचे नियोजन करण्यात येणार आहे. यातून समाजात वैचारिक परिवर्तन व समाज प्रबोधन साध्य करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. येत्या चौथ्या शनिवारी अर्थात २७ जुलै रोजी नृत्य विधा आपले सादरीकरण करणार आहे. ही संपूर्ण माहिती पिंपरी-चिंचवड संस्कार भारती सचिव हर्षद कुलकर्णी यांनी दिली.

HB_POST_END_FTR-A2

.