Pune : एल्गार परिषदेप्रकरणी ­­­­अटकेत असलेल्या पाच जणांवर आरोपत्र दाखल करण्यास 90 दिवसांची मुदतवाढ

पुणे न्यायालयाचा निर्णय

एमपीसी न्यूज – माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, शोमा सेन, महेश राऊत या सगळ्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पुणे न्यायालयाने दिला आहे. 

आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ मिळावी, असा अर्ज पुणे पोलिसांनी न्यायालयात केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.