Kothrud : कारखानदाराला 10 लाखांच्या खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – कोथरूड येथे एका कारखानदाराला एका अज्ञात मोबाईलधारक इसमाने वेळोवेळी फोन करून 10 लाखांच्या खंडणीची मागणी करून खंडणी न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. एका 42 वर्षीय इसमाने याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादी यांचा कोथरूड येथे ट्रान्सफॉर्मरचे सुटे भाग बनविण्याचा छोटा कारखाना आहे. त्यांना एप्रिल महिन्यात सलग 15 दिवस सातत्याने एका अज्ञात मोबाईल धारक इसमाने फोनकरून खंडणीसाठी धमकावले. तुला जर धंदा व्यवस्थित करायचा असेल तर प्रथम 10 लाख रुपये व नंतर दरमहिन्याला दोन लाख रुपये अशी खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

फिर्यादींची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्यांनी आज (दि.27) तक्रार दिली. त्यानुसार एका अज्ञात मोबाइलधारक इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.