Bhushi Dam : लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण झाले ओव्हरफ्लो!

एमपीसी न्यूज –  लोणावळा शहरांमधील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र असलेले भुशी (Bhushi Dam) बुधवारी सकाळी सात वाजता ओव्हरफ्लो झाले. धरण ओव्हरफ्लो झाल्याची बातमी वाऱ्याप्रमाणे शहरात पसरल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी भुशी धरणावर वर्षाविहाराचा गर्दी केली होती.

मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी धरण भरण्यास विलंब लागला असला तरी पर्यटन हंगाम निर्विघ्नपणे जावा अशी अपेक्षा व्यावसायकांनी व्यक्त केली.

Monsoon Update : राज्यात मान्सूनची संततधार; पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही हजेरी

भुशी धरण (Bhushi Dam)हे लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. लाखो पर्यटक दरवर्षी याठिकाणी भेट देत वर्षाविहाराचा आनंद लुटतात. येणार्‍या शनिवार व रविवारी याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.