Pune Crime News : सासरा वाईट नजरेने पाहतो, सुनेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : सासरा वाईट नजरेने पाहत असल्याचा सुनेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती, सासू सासरे यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी एका 32 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेचे 2011 साली लग्न झाले आहे. दरम्यान या कालावधीत सासरी नांदत असताना पती, सासू,सासरे, दीर यांनी संगणमत करून फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला.

तर सासरे यांनी फिर्यादी यांच्याकडे वाईट नजरेने पाहून आणि फिर्यादी यांना पाठीमागून पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.