Indapur News : बापानेच केली एक वर्षाच्या चिमुरडीची हत्या, कारण ऐकून बसेल धक्का

एमपीसी न्यूज : इंदापूर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बापाने स्वतःच्या मुलीचा नाक आणि तोंड दाबून खून केला. खुनाचे कारण समजताच सर्वांच्याच तळपायाची आग मस्तकात गेली. केवळ मुलगी आपली नसल्याचा संशय आल्याने बापानेच या चिमुरडीचा खून केला. इंदापूर पोलिसांनी नराधम बापाला अटक केली. 23 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. 

_MPC_DIR_MPU_II

सकट्या उर्फ चिंटू उर्फ शक्ती उर्फ शक्तिमान विकास काळे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई सोनम सकट्या काळे (वय 18) यांनी फिर्याद दिली आहे. पिला सकट्या काळे (वय 1 वर्षे) असे मयत चिमुरडीचे नाव आहे. इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काळे दांपत्य ऊसतोड मजूर असून अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. ऊस तोडणीच्या कामासाठी ते इंदापूर तालुक्यातील करेवाडी गावात आले होते. घटनेच्या दिवशी आरोपीने फिर्यादीला ‘तू उस तोडलेल्या मोळ्या बांधायला का आली नाहीस’ असे म्हणून तिच्यासोबत भांडण काढले. तसेच कोयता घेऊन तिच्या अंगावर धावून गेला.

त्यानंतर त्यांची एक वर्षाची मुलगी पिला ही कोपी मध्ये झोपलेली असताना ‘ही मुलगी माझी नाही आणि तिचा हुंडा देखील मी तुम्हाला मिळू देणार नाही व मीही खाणार नाही’ असे म्हणून दोन्ही हाताने त्याने स्वतःच्या मुलीचे नाक तोंड दाबून तिला ठार मारले.

त्यानंतर आरोपी आणि सर्व कुटुंबीय अंत्यसंस्कार करण्यासाठी मूळ गावी गेले होते. गुरुवारी फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी नराधम बापा विरोधात गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सारंगकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1