Bhosari News : शोधास अडथळा निर्माण करणा-या आरोपीच्या वडिलांना अटक 

_MPC_DIR_MPU_IV

 एमपीसी न्यूज – रेकाॅर्डवरील आरोपीचा शोध घेण्यासाठी भोसरी परिसरात शुक्रवारी (दि.27) कोंबिग ऑपरेशन राबविण्यात आले होते. यावेळी घरी आलेल्या पोलिसांबरोबर आरोपीच्या वडीलांनी हुज्जत घातली व अंगावर धावून जात आरोपीच्या शोधात अडथळा निर्माण केला. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आहे. 

विजय भाऊराव उपाडे (वय 45, रा. शांतीनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बाळासाहेब गाढवे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकाॅर्डवरील पाहिजे असलेला आरोपी महेश विजय उपाडे याचा शोध घेण्यासाठी भोसरी परिसरात शुक्रवारी (दि.27) कोंबिग ऑपरेशन राबविण्यात आले होते. पोलिस आरोपीचा शोध घेण्यासाठी त्याच्या घरी गेले मात्र, आरोपीच्या वडीलांनी पोलिसांना अटकाव केला. ‘मी मानव हक्क कार्यकर्ता आहे, कोण माझ्या मुलाला अटक करतो ते बघतोच’ असं म्हणत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.

एवढंच नव्हे तर, पोलीस अंमलदार सागर भोसले यांच्या अंगावर धावून जात त्यांची गचांडी पकडली. दरम्यान सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या वडीलांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.