Mumbai: अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा निर्णय कायद्यानुसार होणार; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

The final year exams will be decided by law; Governor bhagat singh koshyari letter to the CM uddhav thackeray

एमपीसी न्यूज- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल असे कळविले आहे.

परीक्षांसंदर्भातील अंतिम निर्णय राज्यपाल घेणार आहेत. कायद्यानुसार निर्णय होणार अशी राज्यपालांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील निर्णय अधांतरी अशी स्थिती निर्माण झाली आहे.


अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर ATKT असणाऱ्या विद्यार्थांचं काय असा प्रश्न उपस्थित केला होता.

जवळपास 40 टक्के विद्यार्थ्यांना ATKT आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ शकते, अशी चिंता शेलार यांनी व्यक्त केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.