Vadgaon Maval News : मावळ तालुक्यातील पहिली इलेक्ट्रिक घंटागाडी वडगावमध्ये

एमपीसी न्यूज – साक्षी डायग्नोस्टिक हेल्थ केअर सोल्युशन यांच्या वतीने नगरसेवक भूषण मुथा यांच्या प्रयत्नातून वडगाव नगरपंचायतला ई – गार्बेज व्हॅन (बॅटरी संचलित) घंटागाडी देण्यात आली. माझी वसुंधरा 2.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत हा उपक्रम राबविला असून ही घंटागाडी मावळ तालुक्यातील पहिली इलेक्ट्रिक घंटागाडी आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सोमाटणे फाटा येथील साक्षी  डायग्नोस्टिक्स् हेल्थ केअर सोल्युशन  यांच्या सी एस आर फंडातून वडगाव नगरपंचायतीला विद्युत घंटागाडी देण्यात आली.

वडगाव नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक भुषण मुथा यांच्या प्रयत्नाने साक्षी डायग्नोस्टिक्स्चे ब्रिजेन्द्र किल्लावाला व सौ किरण किल्लावाला यांनी सीएसआर फंडातून दिलेल्या कचरा गाडीचा लोकार्पण सोहळा वडगाव नगरपंचायतीत मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर व  नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी उपनगराध्यक्षा पुनम जाधव. भाजपा गटनेते दिनेश ढोरे, वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे,  माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, नगरसेविका शारदा ढोरे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळस्कर,  प्रसाद पिंगळे, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजित वाघमारे,शरद मोरे,किरण भिलारे, शंकर भोंडवे, शेखर वहीले, दिलीप मुथा,आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या प्रसंगी शुभेच्छापर आपली मनोगते व्यक्त केली. सुत्रसंचालन कल्पेश भोंडवे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.