Corona To Fetus: पुण्यात घडली देशातील पहिली दुर्मीळ घटना; आईसह गर्भातील बाळाला झाली कोरोनाची लागण

The first rare incident in the country took place in Pune; The fetus along with the mother became infected with corona ससूनमध्ये मागील दहा दिवसांच्या काळात 42 कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिला बाळंत झाल्या आहेत. त्यापैकी सहा बाळांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

एमपीसी न्यूज – प्रसुतीनंतर बाळाला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गर्भात असतानाच कोरोनाचा संसर्ग झाल्याची देशातील पहिली घटना ससून रूग्णालयात घडली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णालयात दाखल हडपसर येथील एका 22 वर्षीय गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बाळाला अनेक लक्षण दिसून आली होती. बाळाचा जन्म झाल्यानंतर नाकातील स्वॅब घेण्यात आला. त्याचबरोबर नाळ आणि नाभीच्या तपासणीनंतर तिला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं.

बाळाची आरटी-पीसीआरद्वारे कोरोना चाचणी करण्यात आली होती. बाळाला 24 ते 48 तासाच्या आतच लक्षणं दिसून आली. तापासह कोरोनाची अनेक लक्षणं बाळामध्ये दिसून आल्याचे ससूनच्या अधिष्ठातांनी म्हटलं आहे.

_MPC_DIR_MPU_II

बाळाची नाभी आणि नाळातील संसर्ग ओळखण्यास सक्षम होतो. आईलाही संसर्ग झालेला होता, मात्र त्याची काही लक्षणं दिसत नव्हती, असं किणीकर म्हणाल्या.

या केस संदर्भातील आमचा रिसर्च पेपर प्रकाशित करण्यासाठी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय जर्नलकडे पाठवला होता. तो स्वीकारण्यात आला आहे. त्याचं स्वीकृती पत्रही काल रात्री आम्हाला मिळालं आहे, अशी माहिती किणीकर यांनी दिली इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

प्रसुतीनंतर बाळाची व्यवस्थितपणे काळजी घेण्याची गरज होती. तशी घेतली गेली. तीन आठवड्यानंतर बाळ पूर्णपणे बरं झालं. जूनमध्ये बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, असं बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितलं.

एचआयव्ही आणि झिका व्हायरसमध्ये अशा पद्धतीनं संसर्ग झाल्याच्या नोंदी आहेत. मात्र, कोरोनामध्ये अशा पद्धतीचं संक्रमण होण्याबद्दलची माहिती दुर्मीळ आहे.

व्हर्टिकल ट्रान्समिशन होण्याची ही घटना देशातील पहिलीच आहे, असं डॉ. तांबे म्हणाले. ससूनमध्ये मागील दहा दिवसांच्या काळात 42 कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिला बाळंत झाल्या आहेत. त्यापैकी सहा बाळांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र हा संसर्ग प्रसुतीनंतर झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.