Pune : मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पूजा करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडईतील टिळक पुतळा येथे सकाळी दहा वाजता पालखीतून आगमन झाले. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गणपतीची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली आहे.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त के व्यंकटेशम आदी उपस्थित होते.

यंदा गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडावी यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घेतला असून यावेळी बेलबाग चौकापासून मुख्य ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ढोल-ताशा पथके लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या बाजूला सज्ज राहणार असून तेथून बेलबाग चौकातच ती पथके मिरवणुकीत सहभागी होतील. यामुळे मंडई ते बेलबाग चौक दरम्यान लागणारा जादा वेळ कमी होणार आहे. तसेच एका पथकात ४० ढोल, १५ ताशे, १० ध्वजधारी आणि ३० जादा वादक असा ताफा असणार आहे. वादकांची संख्या मर्यादित करण्यात आल्याने वेळेत फरक पडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.