India Covid Vaccination : देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील दोन कोटी 65 लाख मुलांना दिली पहिली लसमात्रा

एमपीसी न्यूज – देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 2 कोटी 65 लाखांपेक्षा अधिक (2,65,75,579) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आत्तापर्यंत 18 ते 59 वयोगटातल्या 3,87,719 जणांना वर्धक मात्रा देण्‍यात आली आहे.

भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्‍ये आतापर्यंत देण्‍यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 187 कोटी 67 लाख (1,87,67,20,318 ) मात्रांचा टप्पा पार केला आहे. देशभरामध्‍ये 2,30,29,745 सत्रांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्‍यात आले.

गेल्या 24 तासांत भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.75 टक्के इतका आहे. 1,755 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4 कोटी 25 लाख 19 हजार 479 झाली आहे.

गेल्या 24 तासात 2, 593 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासांमध्‍ये कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4 लाख 36 हजार 532 चाचण्‍या करण्यात आल्या. आत्तापर्यंत भारतामध्‍ये एकूण 83.47 कोटींपेक्षा जास्त (83 कोटी 47 लाख 17 हजार 702) चाचण्‍या करण्‍यात आल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.54 टक्के आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.59 टक्के इतका नोंदला गेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.