Pune :  लॉकडाऊनमधील पहिले पाच दिवस अत्यंत कडक – डॉ. दीपक म्हैसेकर

The five days seen in the lockdown are very strict - Dr. Deepak Mhaisekar : पुणे, पिंपरी - चिंचवड, कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत लॉकडाऊन

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरासह कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दि. 13 ते 23 जुलै, असा 10 दिवसांचा हा लॉकडाऊन असेल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज, शुक्रवारी दिली.

यामध्ये पाहिले 5 दिवस अत्यंत कडक स्वरूपाचा लॉकडाऊन असेल. त्या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असेल. नवीन लॉकडाऊनची नियमावली उद्या सायंकाळी जाहीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील काही दिवसांत पुणे शहर, पिंपरी चिंचवड परिसरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना साखळीला ब्रेक लावण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कालावधीत सक्षम वैद्यकीय यंत्रणा निर्माण करण्यासाठी वेळ मिळणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ऑनलाइन पासेस पोलीस आयुक्त उपलब्ध करून देणार आहेत. या लॉकडाऊनमध्ये दूध आणि औषधांची दुकाने सुरू राहणार असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

सोमवारी (दि. 13 जुलै) मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याआधीच्या कालावधीत नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून घ्यावी.

पाहिले 5 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन असेल. यासंबंधीची नियमावली पुणे महापालिका उद्या जाहीर करेल, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीरच आहे. आपण काही सवलती दिल्या होत्या. पण, नागरिकांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे आज लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत पूर्वीसारखेच बंधने असतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.