Pimpri News : पीठ गिरण्या गुरुवारी चालू तर शनिवार, रविवारी बंद राहणार

0

एमपीसी न्यूज – प्रशासनाच्या आदेशानुसार दर शनिवारी व रविवारी लॉकड़ाऊनमुळे पीठ गिरण्या बंद राहणार आहेत. त्यामुळे पुढील निर्णयापर्यंत दर गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पीठ गिरण्या चालू राहतील, अशी माहिती  पिंपरी-चिंचवड चालक मालक पीठगिरणी महासंघाचे शहराध्यक्ष सुरेश लिंगायत यांनी दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत लिंगायत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीठ गिरण्या चालकांनी दररोज सायंकाळी सहा वाजता गिरणी बंद करावी. गिरणीचे मेंटेनन्स दुपारच्या सदरात करावे जेणे करुन जेवणानंतर गिरण्या फार वेळ सलग बंद राहणार नाही. ग्राहकांची सेवा नियमित राहील व गर्दी होणार नाही. दर शनिवारी व रविवारी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन गिरण्या बंद ठेवाव्यात. चालकांनी चेहर्‍यावर मास्क अथवा रुमाल लावावा.

ग्राहकांनी गिरणीत अकारण गर्दी करु नये किंवा चालकाशी दळण लवकर द्यावे म्हणून वाद घालू नये. शनिवार व रविवार सलग दोन दिवस लॉकडाऊनमुळे गिरण्या बंद राहणार आहेत. त्यामुळेच महावितरणने नेहमीप्रमाणे गुरुवारी शटडाऊन न घेता विज पुरवठा अखंड चालू ठेवावा, अशी मागणीही लिंगायत यांनी केली आहे. तसेच फावल्या वेळात स्वतःच्या जबाबदारीवर चांगल्या प्रतिचे धान्य गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळ, नाचणी दळून ग्राहकांना व्रिकीची व्यवस्था करावी, असेही लिंगायत यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment