BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पाषाण-सूस आणि सिंहगड रस्त्यांवर होणार उड्डाणपूल

0

एमपीसी न्यूज – मुंबई – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. चारवरील पाषाण – सूस आणि सिंहगड रस्त्यांवरील राजाराम पूल ते फन टाईम थिएटरपर्यंत उड्डाणपूल उभारण्यास पुणे महापालिका स्थायी समितीने आज मंजुरी दिली.

सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव, धायरी, नांदेड गाव, खकडवासला ही गावे झपाट्याने विकसित होत आहेत. सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने भविष्यात वाहतुकीचा संपूर्णतः ताण याच रस्त्यावर येणार आहे. या भागातून पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने सिंहगड रस्त्याचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर उड्डाणपूल आवश्यक आहे. 2018 – 19 च्या आर्थिक वर्षात 10 कोटी तर, 2019 – 20 च्या अंदाजपत्रकात 60 कोटी व चालू आर्थिक वर्षात 30 कोटी तरतूद केली आहे.

मुंबई – राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 लगत हिंजवडी परिसरात आयटी पार्क मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. त्यामुळे पाषाण – सूस रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण येत आहे. या रस्त्यावर 8 मी. रुंदीचा अस्तित्वातील पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. भविष्याचा विचार करता या रस्त्यावर उड्डाणपूल आवश्यक आहे. 2019 – 20 च्या अंदाजपत्रकात 10.50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.