Pimpri News : चार वर्षाच्या ऋग्वेदाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील ऋग्वेदा सागर विरकर या अवघ्या 4 वर्षे वयाच्या मुलीची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाल्याबद्दल महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते तीचा सत्कार करण्यात आला.  तीने मानवी शरीर रचना, विज्ञान, यामध्ये सांगाडा प्रणाली, मानवी शरीरातील हाडांची नावे, पचनसंस्था व त्यांच्या ग्रंथी उत्सर्जन संस्था, श्वसन प्रणाली, मज्जासंस्था आणि मानवी दातांचे प्रकार सांगून अनोखा विक्रम प्रस्थापित केला.

महापौर कक्षात झालेल्या सत्कारास माजी महापौर नितीन काळजे, उपआयुक्त संदीप खोत, ऋग्वेदाचे वडील सागर विरकर, आई तृप्ती विरकर उपस्थित होते.

ऋग्वेदा एक मिनिटे 21 सेकंदात अनेक देशांची नावे आणि त्यांच्या राजधान्यांची अचूक माहिती सांगते तसेच अवघ्या 4 मिनिटे आणि 56 सेकंदात भारतातील राज्य व केंद्रशासीत प्रदेश यांची नावे व राजधान्यांची माहिती सांगते. ऋग्वेदाने तीन स्पर्धेत प्राविण्य मिळवून 12 करंडक 18 पदके आणि 41 प्रशस्तीपत्रके मिळविली आहेत. ऋग्वेदाच्या अनोख्या विक्रमाचा कार्यक्रम ‘युनिक गर्ल ऑफ इंडीया’ या युट्यूब चॅनल वर लाखो फॉलोअर्स पाहतात अशी माहिती तिच्या पालकांनी दिली तसेच ऋग्वेदाला भविष्यात अंतराळवीर होण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.