Pimpri News : जम्बो कोविड सेंटर मधून रुग्णाचा ऐवज चोरीला जाण्याची चौथी घटना उघड

एमपीसी न्यूज – नेहरुनगर पिंपरी येथील जम्बो कोविड सेंटर मधून रुग्णांचे ऐवज चोरीला जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यापूर्वी तीन प्रकरणात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी (दि. 11) आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण अंबादास सुतार (वय 48, रा. शास्त्री चौक, भोसरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण सुतार नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये उपचार घेत होते. 29 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांचे 21 हजार चारशे रुपये किमतीचे 19 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.