Pune : अज्ञात मोबाईलधारकाकडून लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन माध्यमाद्वारे अज्ञात मोबाईलधारकाकडून लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची एक लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली. ही घटना 14 मे ते 24 मे या कालावधीत घडली. याप्रकरणी एका 24 वर्षीय तरुणाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.

फिर्यादी यांना एका अज्ञात मोबाईलधारक इसमाने नामांकीत कंपनीकडून 5 लाख रुपयांचे लोन मिळवून देतो असे सांगून त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यात एकूण एक लाख 6 हजार रुपये भरण्यास भाग पाडून फिर्यादी यांची फसवणूक केली.

अलंकार पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.