Pimpri : उसने दिलेले पैसे व मेमरी कार्ड परत न केल्याने मित्राचा केला खून (व्हिडिओ) 

महिन्याभरानंतर गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

एमपीसी न्यूज – हातउसने घेतलेले आठशे रुपये आणि मोबाइलचे मेमरी कार्ड परत केले नसल्याने मित्राचा खून केल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे. महिनाभरापूर्वी  म्हणजेच 16 जुलै 2018 रोजी रहाटणी येथे ही घटना घडली होती.  

याप्रकरणी अनिल श्रावण मोरे (वय 39, रा. सायली पार्क, भैय्या चाळ, रहाटणी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पवन उर्फ अनिल रमेश सुतार-हिरे (वय 39, मुळगाव चिंबळी ता. खेड जि. पुणे) असे खून झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे.

_PDL_ART_BTF

रहाटणी येथे 16 जुलैला सकाळी सुतार याचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. तपासादरम्यान सुतारकाम करणारा अनिल आणि पवन हे दोघे मित्र होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली होती.

पवन याचा मृत्यू झाल्यापासून अनिल याने मोबाईल फोन बंद करुन ठेवला असल्याची, माहिती पोलिसांना मिळाली. अनिल हा बावधन येथील एका शाळेत सुतारकाम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मयत पवन याने हातउसने दिलेले 800 रुपये व मोबाईलचे मेमरीकार्ड परत केले नव्हते. त्यामुळेच पटाशीच्या साहाय्याने खून केल्याची कबूली अनिल याने दिली, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.