Chakan : चोरीच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – चोरी करण्याच्या पूर्ण तयारीत असलेल्या टोळीला चाकण पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 4) पहाटे तीनच्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीत घडली.

सुनील नितीन दाभाडे (वय 25, रा. कोटेश्वरवाडी, तळेगाव), परशुराम शंकर केसापुरे (वय 25, रा. समता कॉलनी, वराळे स्टेशन, ता. मावळ), राजू दत्तू मराठे (वय 22), हृषीकेश विलास दाभाडे (वय 22, दोघे रा. माळवाडी, ता. मावळ) आणि अन्य एक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत. यांच्यासोबत असलेले तीनजण पळून गेले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निघोजे गावात चाकण पोलीस मंगळवारी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी निघोजे गावात पाच जणांचे टोळके एक टेम्पो घेऊन संशयितरित्या उभारलेले दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी सर्वजण पळून जाऊ लागले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता सुनील याच्या कमरेला चाकू, परशुराम याच्या खिशामध्ये मिरची पूड असे साहित्य मिळाले. दरम्यान तिघेजण पळून गेले. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे कसून चौकशी केली असता ते चोरी करण्याच्या उद्देशाने उभारले असल्याचे त्यांनी कबूल केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.