Chakan : टपरीवर पानाच्या पैशांवरून झालेल्या वादातून टोळक्याकडून हॉटेलमध्ये तोडफोड

एमपीसी न्यूज – पानाच्या टपरीवर झालेल्या किरकोळ वादातून नऊ जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये जाऊन तोडफोड करून तरुणाला व त्याच्या मित्रांना मारहाण केली. ही घटना 14 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता कार्तिकी हॉटेल, कोये येथे घडली.

शुभम विजय पवार (वय 24, रा. कोये, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बाळासाहेब शिवकर, विशाल डांगले, प्रमोद खेंगले व अन्य पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम यांचे कोये गावाजवळ कार्तिकी हॉटेल आहे. आरोपी बाळासाहेब आणि विशाल या दोघांचे हॉटेलच्या बाहेर असलेल्या पानाच्या टपरीवर पानाच्या पैशांवरून टपरीवरील मुलासोबत भांडण झाले. त्या रागातून आरोपींनी आपल्या साथीदारांना जमवून हॉटेलमध्ये जाऊन लाकडी दांडके व लोखंडी पाईपने हॉटेलची तोडफोड केली. तसेच शुभम आणि त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.