Pune News : बोगस पासपोर्ट घेऊन तरुणी गेली दुबईला

पुणे विमानतळावर परत येताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0

एमपीसी न्यूज : बनावट कागदपत्रांच्या आधारे तरुणीला पासपोर्ट मिळवून देणाऱ्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. एका 22 वर्षीय तरुणीला आरोपीने दुबईला जाण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून दिला होता.

सूर्यकुमार सुब्रमण्यम बलजी (वय 50) असे आरोपीचे नाव आहे. एका 22 वर्षीय तरुणीला या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आली आहे. 3 डिसेंबर च्या रात्री हा प्रकार उघडकीस आला होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपी सूर्यकुमार बलजी याने 22 वर्षीय महिलेला बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून दिला होता. त्या आधारे तिने दुबईत नोकरीसाठी व्हिसा मिळवला होता. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी ही तरुणी दिल्ली येथून दुबईला गेली होती. तीन डिसेंबरला परत आल्यानंतर आणि पोलिसांनी तिला विमानतळावर अटक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.