HSC Result 2022 : बारावीच्या परीक्षेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या मुलींची बाजी

तीनही शाखांमध्ये मुलीच प्रथम

एमपीसी न्यूज – बारावीच्या परीक्षेत (HSC Result 2022) दरवर्षीप्रमाणे इंद्रायणी महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. इंद्रायणी महाविद्यालयाचा बारावी विज्ञान विभागाचा निकाल 95.86 टक्के, वाणिज्य 94.72 कला शाखेचा निकाल 79.24 टक्के लागला आहे.

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) बुधवारी (दि. 8) जाहीर झाला असून इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या, इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींनी यंदाही गतवर्षीप्रमाणे तीनही शाखांमध्ये बाजी मारली आहे.

Todays Horoscope 09 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त तसेच प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य अशोक जाधव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आजी-माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे

विज्ञान शाखा

1) कु. पानसकर तेजश्रीराजे हनुमंत 90.83
2) कु. वाघमारे शिवानी सुनील 90.50
3) कु. साक्षी मोहन दाभाडे 87

वाणिज्य शाखा

1) कु. भेगडे रिया राजेंद्र 90
2) सुनार तिळक भगतबाहदुर 89
3) अमरीश येलबाई राजाप्पा 88.50

कला शाखा

1) कु. मोढवे श्यामल संदीप 81.67
2) कु.बाजारे रिया तात्याबा 79.17
3) कु. गोबी आकांक्षा वनभद्र 77

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.