Chinchwad : मध्यरात्री रस्त्याच्या बाजूला थांबल्याप्रकरणी विचारणा करणाऱ्या पोलिसांशी तरुणींची हुज्जत (व्हिडीअो)

एमपीसी न्यूज – मध्यरात्री रस्त्याच्या बाजूला नंबर नसलेली दुचाकी घेऊन संशयितरित्या एका तरुणासोबत थांबलेल्या दोन तरुणींची पोलिसांनी विचारणा केली. यावरून तरुणींनी पोलिसांशी अर्वाच्य भाषा वापरत हुज्जत घातली. त्यावरून पोलिसांनी त्या तिघांना पोलीस ठाण्यात आणले असता, पोलीस ठाण्यातही या तरुणींनी दंगा घातला. हा प्रकार आज (गुरुवारी) मध्यरात्री एकच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनसमोर घडली.

स्मिता किशोर बाविस्कर (वय 22, रा. ओटास्कीम, निगडी), प्रिया प्रदीप पाटील (वय 30, रा. पाटील नगर, चिखली) आणि आकाश मिलिंद कोरे (वय 25, नढे नगर, काळेवाडी) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस आज मध्यरात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनसमोर स्मिता, प्रिया आणि आकाश हे तिघेजण संशयितरित्या थांबलेले आढळून आले. त्यांच्याजवळ नंबर नसलेली दुचाकी होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तरुणींनी पोलिसांना अर्वाच्य भाषा वापरली आणि त्यांच्याशी हुज्जत घातली.

त्यावरून पोलिसांनी तिघांनाही चिंचवड पोलीस ठाण्यात आणले. तरुणींनी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत अर्वाच्य भाषा वापरून दंगा केला. त्यामुळे पोलिसांनी तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे तसेच सार्वजनिक शांतता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.