Lonavala News : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम प्रशासकीय कारणास्तव ढकलला पुढे

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपालिका क्षेत्रात आयोजित करण्यात आलेला ‘शासन आपल्या दारी उपक्रम’ प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे. उपक्रमाची नियोजित तारीख कळवली जाईल असे मावळ तहसीलदारांनी सांगितले आहे.

मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी याबाबत पत्रक दिले आहे. महाराजस्व अभियानांतर्गत लोणावळा नगरपालिका क्षेत्रात 19 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीत ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. तो उपक्रम नियोजित तारखेला होणार नाही.

प्रशासकीय कारणास्तव शासन आपल्या दारी हा उपक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. या कार्यक्रमाची नियोजित तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. मात्र तारीख निश्चित झाल्यानंतर सर्व संबंधितांना अवगत केले जाणार असल्याचेही तहसीलदारांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.