India to import Remdesivir : भारत सरकार रेमडेसिवीरचे साडे चार लाख डोस आयात करणार 

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी विविध देशांतून भारतात मदत येत आहे. तसेच, आता रेमडेसीवीरचा तुटवडा भरून काढण्यासाठी भारत सरकार साडे चार लाख डोस आयात करणार आहे. 

_MPC_DIR_MPU_II

आयात करण्यात येणाऱ्या साडे चार लाख डोसपैकी 75 हजार डोस आज (शुक्रवारी) भारतात दाखल होणार आहेत. एचएलएल लाईफ केअर या भारत सरकारच्या कंपनीने अमेरिकन व इजिप्शियन कंपनीकडून हे डोस अयात केले आहेत. अमेरिकन कंपनी गिलियड येत्या दोन दिवसांत 75 हजार ते एक लाख डोस भारतात पाठविण्याची शक्यता आहे. तर, इजिप्शियन कंपनी ईव्हीए सुरुवातीला दहा हजार डोस आणि नंतर दर पंधरा दिवसाला पन्नास हजार डोस पुरवणार आहे.

भारतात देखील रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन वाढवले आहे. 27 एप्रिल पासून सात उत्पादक कंपन्यांची उत्पादन क्षमता 38 लाख वरुन 1.03 कोटी एवढी झाली आहे. दररोज 67 हजार 700 एवढा होणारा पुरवठा आता वाढवून 2 लाख 9 हजार एवढा करण्यात आला आहे. भारत सरकारने रेमडेसीवीरच्या निर्यातीवर देखील बंदी घातली आहे. तसेच, इंजेक्शनच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रमुख उत्पादनाच्या इंजेक्शनची किंमत साडे तीन हजारांच्या खाली आणली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.